‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !
पिंपरी – नागरिकांची सुरक्षा आणि गुन्हेगारी अन् वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांनी मिळून शहराच्या विविध ठिकाणी ५ सहस्त्रांहून अधिक (कॅमेरे) छायाचित्रक बसवले आहेत. निगडी येथील ‘आयसीसी सेंटर’ येथे झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखणे, यासाठी ही प्रणाली उपयुक्त असून यातील छायाचित्रकांमुळे वाहनांची ‘नंबर प्लेट’ ओळखता येणे शक्य होणार आहे.
(प्रत्येक नागरिकाने जर घालून दिलेल्या नियमांचे पालन केले, तर अशा वेगळ्या प्रणालीची आवश्यकता रहाणार नाही. नागरिकांमध्ये नियम पालन करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षेसह त्यांची नीतीमत्ता उंचावण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक ! – संपादक)