सद़्गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्हावरी ।
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ६.३.२०२३ पासून आश्रमातील निवासी खोलीमध्ये सद़्गुरु राजेंद्र शिंदे (सद़्गुरु दादा) यांच्या समवेत राहिल्याने त्यांचा अनमोल सत्संग लाभत आहे आणि त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्फुरलेली कवितारूपी कृतज्ञता पुष्प त्यांच्या चरणी वहात आहे.
सद़्गुरु शक्तीरूपी चैतन्याचा हिमालय असेे देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली सनातनच्या वनी ॥ १ ॥
सद़्गुरूंनी साधकरूपी फुलझाडांना दिले हो प्रीतीचे खत-पाणी ।
साधकरूपी फुलांचा सडा पडला हो सद़्गुरुरायांच्या चरणी ॥ २ ॥
सद़्गुरूंच्या क्षात्रतेजाचे किरण पडती हो साधकांवरी ।
साधकांचे स्वभावदोष अन् त्रास (टीप १) यांचे वृक्ष पडती उन्मळूनी ॥ ३ ॥
सद़्गुरूंच्या ब्राह्मतेजाचे किरण पडती हो साधकांवरी ।
दैवी गुणांच्या फुलांनी साधकरूपी वृक्ष-वल्ली गेली बहरूनी ॥ ४ ॥
साधना गतीने होण्या हृदयी ठेवूया हो सद़्गुरूंच्या शिकवणी ।
सदैव कृपा असावी आम्हावरी, प्रार्थना ही सद़्गुरुचरणी ॥ ५ ॥
साधना, सेवा वाढवूया, सद़्गुरूंच्या वाढदिवसाचे निमित्त साधूनी ।
सद़्गुरूंसंगे मी घडतो, तुम्हीही घडा हीच साधकांना विनवणी ॥ ६ ॥
सद़्गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्हावरी ।
वाढदिनी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया सद़्गुरु चरणी ॥ ७ ॥
(कवितेत जेथे ‘सद़्गुरु’ म्हटले आहे, ते म्हणजे सद़्गुरु राजेंद्र शिंदे )
टीप १ – वाईट शक्तींमुळे होणारे आध्यात्मिक त्रास आणि स्वभावदोषांमुळे होणारे मानसिक त्रास
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.९.२०२३)