संस्कृत सुवचने
स्वतःच्या उद्धारास किंवा अधोगतीस आपणच कारणीभूत असतो !
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ – श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ६, श्लोक ५
अर्थ : मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जिवाचे मित्र, तसेच शत्रूही आहे.
आपल्या उद्धारास किंवा अधोगतीस आपणच कारणीभूत असतो. ‘स्वभावानुसार मार्ग निवडला’, की, तेथे श्रद्धा दृढ करण्याचे काम मी करतो’, असे भगवान म्हणतात…
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ – श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ७, श्लोक २१
अर्थ : मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो. त्यामुळे तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.
स्वतःबरोबर कठोर वर्तन, म्हणजे तपाचरण आणि दुसर्याबरोबर उदारता म्हणजे कायिक, वाचिक किंवा मानसिक अहिंसा !
(साभार : साप्ताहिक ‘शिवपथ’, फेब्रुवारी २०१९)