संस्कार प्रतिष्ठान आणि अन्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या मोहिमेत चिंचवड (पुणे) येथील घाटावर १ सहस्र ८५३ श्री गणेशमूर्तींचे दान !
संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !
पुणे – गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबरला बहुतांश घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका, डॉ. डी.वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हॉलेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान’ उपक्रम विसर्जनाच्या सातव्या दिवशी राबवण्यात आला. रात्री १२ वाजेपर्यंत हॉटेल रिव्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे मूर्तीदान उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (अशास्त्रीय मोहीम राबवणारे आणि त्याला साथ देऊन मूर्तीदानाची अयोग्य कृती करणारे भाविक यांवर श्री गणेशाने कृपा तरी का करावी ? – संपादक) सकाळी ८ पासून रात्री १२ वाजेपर्यंत १ सहस्र ८५३ मूर्तींचे दान मिळाले आणि अनुमाने ६ टन निर्माल्याचे दान मिळाले.
मागील वर्षापेक्षा १४३ मूर्तींचे दान अधिक मिळाले. मागील वर्षी सातव्या दिवशी १ सहस्र ७१० मूर्तींचे दान मिळाले होते. निर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद़्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी साहाय्य केले. (गणेशोत्सवात मूर्तीदानसारख्या अशास्त्रीय संकल्पना राबवून हिंदूंंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आता भाविकांनीच खडसावून सांगण्याची वेळ आली आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकावर्ष २०१७ मध्ये संस्कार प्रतिष्ठानने दान घेतलेल्या ३० सहस्र ३६५ श्री गणेशमूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत विसर्जन केले होते. सामाजिक माध्यमांवरही दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती खाणीत फेकून देतांनाचे कित्येक ‘व्हिडिओ’ समोर येतात. दान घेतलेल्या मूर्तींचे होणारे श्री गणेशाचे विडंबन टाळण्यासाठी गणेशभक्तांनी मूर्तीदान करणे टाळावे ! |