मोरबे धरणक्षेत्रात विनाअनुमती जाणार्यांवर गुन्हा नोंद होणार ! – पोलीस निरीक्षक कुंभार
लोकप्रतिनिधींनी सर्व नियमावलींचे पालन करणे आवश्यक !
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात विनाअनुमती प्रवेश करून जलपूजन करणार्यांवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.
https://t.co/2waRaYrVCB
भाजपच्या मोरबे जलपुजनावर कॉंग्रेसचा आक्षेप
विनापरवानगी जलपुजन, बेकायदेशीर प्रवेशप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या पालिकेच्या हालचाली सुरू?
मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० % पातळी
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com pic.twitter.com/MzRO4EOKjU— Navimumbailive.com (@navimumbailive) September 24, 2023
माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह अन्य माजी महापौर आणि माजी नगरसेवक, नगरसेविका यांनी प्रशासनाच्या अनुमतीविना मोरबे धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात प्रवेश करून जलपूजन केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात केली आहे. धरणाच्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकांनी या सर्वांना विरोध केला होता; पण कुणीही त्यांना जुमानले नाही.