भाजप कार्यालयाची जाळपोळ, तर प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड !
मणीपूरमध्ये हिंदु मैतई समाजाच्या २ विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर हिंसाचार
इंफाळ (मणीपूर) – येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली. तसेच इंफाळमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी १ सहस्र ६९७ जणांना कह्यात घेतले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह विद्यार्थ्यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या इंफाळ येथे पोचले आहेत.
सौजन्य टाइम्स नाऊ
राजधानी इंफाळसह अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षादल यांच्यामध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी घायाळ झाले. गेल्या २ दिवसांत इंफाळमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये ५० जण घायाळ झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.