शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी राज्यशासन करणार ब्राझीलमधील शेतीचा अभ्यास
मुंबई – ब्राझीलमधील शेतीच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांच्या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन करत आहे.
ब्राझीलच्या शिष्टमंडळाने भारतीय दूतावासाच्या मार्फत आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रातील पारंपरिक शेती व त्याला आधुनिकतेची मिळत असलेली साथ त्याचबरोबर कृषी क्षेत्रात गुंतवणुकीच्या असलेल्या संधी याबाबत सविस्तर… pic.twitter.com/SBhRnGfgii
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 26, 2023
ब्राझीलमधील वरिष्ठ अधिकार्यांच्या एका शिष्टमंडळासमवेत २६ सप्टेंबर या दिवशी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची याविषयी मुंबई येथे प्राथमिक चर्चा झाली. या वेळी धनंजय मुंडे यांनीही महाराष्ट्रातील पारंपरिक शेती आणि नवनवीन प्रयोग यांविषयी ब्राझीलच्या शिष्टमंडळाला माहिती दिली.