कल्याण येथे हिंदु ट्रकचालकाची हत्या करणारे २ धर्मांध अटकेत !
ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी पुलाजवळ टायर नादुरुस्त झाल्याने ट्रक बाजूला घेऊन उभ्या असलेल्या ट्रकचालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळून अंजला लियाकत खान (वय २३ वर्षे) आणि महंमद अनस शेख (वय २१ वर्षे) यांना अटक केली आहे. ट्रक थांबवल्याने दुचाकीची हानी झाली असून ती भरून देण्याची मागणी खान आणि शेख यांनी ट्रकचालक भोलाकुमार महातो यांच्याकडे केली होती; परंतु ती पूर्ण करण्यास नकार दिल्याने दोघांनी महातो यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांना जागीच ठार केले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(सौजन्य : Maharashtra Crime Spot)
संपादकीय भूमिकाआणखी किती हिंदूंच्या हत्या झाल्यावर पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणार ? |