श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद !
पुणे – शहरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला २८ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्त्यांना वळवण्यात आली आहे. काही रस्ते सकाळी १०, दुपारी १२ वाजता, तर काही दुपारी ४ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी १ सहस्र १०० वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे.