निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या ! – लोकराज्य जनता पक्ष
कोल्हापूर – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे धोरण लागू करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना ‘लोकराज्य जनता पक्षा’च्या वतीने देण्यात आले. ‘या निवेदनाच्या प्रती पुढील कार्यवाहीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तात्काळ पाठवू’, असे संजय तेली यांनी सांगितले. या वेळी ‘लोकराज्य जनता पक्षा’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा संघटक संतोष बिसरे, महिला आघाडीच्या संघटक जयश्री बनसोडे उपस्थित होत्या.