१ ऑक्टोबर या दिवशी राज्यात राबवणार ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक घंटा’ उपक्रम ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. यामित्ताने १ ऑक्टोबर या दिवशी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक घंटा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न रहाता त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. १ ऑक्टोबर या दिवशी प्रत्येकाने स्वत:चा १ घंटा स्वच्छतेसाठी द्यावा. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ राबवण्यात येणार आहे. लोकसहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.