ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !
आज ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये निर्णय घेतांना वा वागतांना धर्माचा, न्यायाचा, सत्याचा चांगला विवेक करून प्रजेच्या कल्याणासाठी या तिघांची कास अत्यंत निष्ठेने धारण करणारा निःस्वार्थी असा शासनकर्ता असला पाहिजे. तो दुःखाला, कष्टाला, संकटाला वा लोकांमध्ये होऊ शकणार्या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्या अर्थाने धर्मनिष्ठ असावा.
(साभार : ‘वरद वाणी’ अॅप)