आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !
गुरुग्राममध्ये विहिंप आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे षडयंत्र उघड !
गुरुग्राम (हरियाणा) – गुरुग्राममध्ये विश्व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक लावले. या फलकांवर मुसलमानांना धमकी देणारे लिखाण होते. यासह या फलकांवर झोपडपट्टी रिकामी करण्याचया संदर्भातील मजकूर होता, असे सांगण्यात येत आहे. या आधारावर इस्लामी समुदाय, साम्यवादी गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते यांनी हिंदु संघटनांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. हे फलक लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या आसिफ याला अटक केली असून त्याने गुन्हा स्वीकारला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Nuh violence: Posters threatening Muslims were put up by Asif, how Islamists and leftist media had tried to blame VHPhttps://t.co/m5MjwRPpvO
— OpIndia.com (@OpIndia_com) September 25, 2023
शहानिशा न करता प्रसारमाध्यमांनी हिंदु संघटनांनाच ठरवले दोषी !
हिंदु संघटनांच्या विरोधात सतत दिशाभूल करणार्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणार्या वृत्तसंस्थांनी या प्रकरणी हिंदु संघटनांना दोषी ठरवले. पोलिसांच्या अन्वेषणाची वाट न पहाता या वृत्तसंस्थांनी विहिंप आणि बजरंग दल यांच्यावर टीका चालू केली होती.