पुणे येथील लष्कर भागातील श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा नोंद !
पुणे – येथे एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून १ सहस्र रुपयांची श्री गणेशोत्सवाची वर्गणी मागणार्या २ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नीलेश कणसे आणि अविनाश पंडित अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याविषयी गणेश पाटणे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. लष्कर भागात गणेश पाटणे यांचे चहा विक्रीचे दुकान आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी दुकानात येऊन १ सहस्र रुपयांची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पाटणे यांना दोघांनी मारहाण केली.