कसार्याजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड वाहतूक खोळंबली !
ठाणे, २६ सप्टेंबर (वार्ता.) – मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा या मार्गावरील उंबरमाळी थांब्याजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना २६ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता घडली. त्यामुळे आसनगाव, खर्डी, कसारा मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या नंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. याचा परिणाम कसारा-सी.एस्.टी., भुवनेश्वर एक्सप्रेस, धुळे-दादर या ३ गाड्यांवर झाला. त्यामुळे गाडीतील प्रवासी ताटकळले होते.