कोल्हापूर महापालिकेला भाविकांनी दान दिलेल्या श्री गणेशमूर्ती ओढ्यात टाकण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव !
पोलिसांकडून ट्रॅक्टरसह चालक कह्यात !
कोल्हापूर – कोल्हापूर येथे श्री गणेशभक्तांनी महापालिकेला दान दिलेल्या श्री गणेशमूर्ती शास्त्रीनगर येथील ओढ्यात टाकण्याचा प्रयत्न करणार्या एका ट्रॅक्टरचालकास भाविकांनी पकडले. यानंतर भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने नागरिक संबंधित ट्रॅक्टरचालकाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने तणाव निर्माण झाला. भाविक आक्रमक झाल्यावर ट्रक्टरचालकाने तेथून पलायन केले. ही घटना पोलिसांना समजल्यावर ते घटनास्थळी आले. यानंतर पोलिसांनी महापालिकेचा हा ट्रॅक्टर कह्यात घेतला, तसेच काही काळानंतर त्या वाहनचालकासही कह्यात घेतले. (भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्यात. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल ! – संपादक)