पोलीस ठाण्यातून पाणी पिण्याच्या निमित्ताने चोर पळाला
मुंबई – कफ परेड पोलीस ठाण्यात चौकशी चालू असतांना एका चोराने पाणी पिण्याचे निमित्त करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. पोलीस पकडण्यास गेले असता मोकळ्या मैदानात तो पोलिसांना दिसला. पोलीस जवळ येण्याचा प्रयत्न करत असतांना शेख याने तोंडात लपवलेले ब्लेड काढून स्वतःवर वार केले. पोलिसांनी त्याला कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवरही ब्लेडने वार केले. (हे पोलिसांना लज्जास्पद !- संपादक) गुलाम शेख याला पोलिसांनी मनोरुग्णालयात भरती केले आहे.