देवा, तुझ्याविना क्षणही न जावा ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘३.८.२०२३ या दिवशी पहाटेच्या वेळी गुरुचरणांचे स्मरण करत असतांना अंतरात आर्तभाव निर्माण झाले आणि पुढील पद्यपक्तींमध्ये श्री गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) प्रार्थना होऊ लागली.
ऐसी स्थिती करी गा देवा ।
तुझ्याविना क्षणही न जावा ।
चिंतनात तू असावा ।
हृदयांतरी तू वसावा ॥ १ ॥
नेत्रांमाजी तू ठसावा ।
जीवांमाजी (टीप) तुला पहावा ।
कर्णांनी तुजला ऐकावा ।
वाणीनेही तुलाच गावा ॥ २ ॥
नामरूपे मुखी रहावा ।
विचारांतही तूच असावा ।
श्वासोच्छवासी तुझाच धावा ।
तूच प्राणांचा विसावा ॥ ३ ॥
जगताचा या विसर पडावा ।
तुझ्या कारणे देह पडावा ।
तुझ्या कारणे देह पडावा ।
ऐसी स्थिती करी गा देवा ॥ ४ ॥
टीप – सर्व प्राणीमात्रांमध्ये
– श्रीमती अलका वाघमारे (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२३)