‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी येणार !
|
जिनीव्हा (स्वित्झर्लंड) – जगभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवल्यानंतर आता अशा प्रकारची नवी महामारी येऊ शकते, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ही महामारी कोरोनापेक्षा तब्बल ७ पटींनी अधिक घातक असून त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो, असा संघटनेने दावा केला आहे.
सतर्क रहें! कोविड-19 से भी डेंजरस है “Disease X” महामारी के रूप में। यह महामारी मौत का कहर बरपा सकती है, जैसे कोरोना की वैश्विक महामारी का डर। “Disease X” एक संघातक संक्रामक बीमारी है।#followme#diseaseX #BreakingNews pic.twitter.com/u7heflxb8K
— Newshubs7 (@Newshubs7) September 26, 2023
ब्रिटनच्या ‘वॅक्सीन टास्क फोर्स’च्या प्रमुख केट बिंघम यांनी याविषयी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने या महामारीला ‘डिसीझ एक्स’ असे नाव दिले असून ती केव्हाही जगावर घाला घालू शकते. जर या रोगाने महामारीचे रूप घेतले, तर किमान ५ कोटी लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे. वर्ष १९१८-१९ मध्ये एका महामारीमुळे अशा प्रकारे ५ कोटी लोक मृत्यूमुखी पडले होते. वैज्ञानिक या रोगाविषयी माहिती एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Disease X Could Bring Next Pandemic, Kill 50 Million People, Says Expert https://t.co/fKQzhmbHUt pic.twitter.com/l9mFwgo65V
— NDTV (@ndtv) September 26, 2023
संपादकीय भूमिकाजागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही जागतिक स्तरावर मानवी स्वास्थ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी झाली आहे. या उद्देशपूर्तीसाठी ती जगातील देशांसमवेत कार्य करत असते. असे असूनही ती अशा महाभयावह महामार्या थांबवू शकत नाही का ? कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत याच संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते. त्यामुळे आता या संघटनेच्या पदाधिकार्यांचे अन्वेषण करण्याची कुणी मागणी केली, तर त्यात चूक ते काय ? |