ब्रिटनने १२ खलिस्तानी आतंकवाद्यांना केली अटक, ४० जणांचे व्हिसा रहित !
भारतानंतर आता ब्रिटनचीही खालिस्तान्यांवर कारवाई !
(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का)
लंडन (ब्रिटन) – खालिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या संदर्भात कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपानंतर जिथे भारताच्या ‘एन्.आय.ए.’ने खलिस्तान्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास आरंभ केला आहे, तिथे ब्रिटननेही कठोर भूमिका घेतली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आदेशानुसार बनवण्यात आलेल्या विशेष कृती दलाने (‘स्पेशल टास्क फोर्स’ने) १२ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक केली आहे, तसेच ४० हून अधिक खलिस्तान्यांचे व्हिसा रहित केले आहेत. भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तान्यांच्या विरोधात आरोपपत्रच प्रविष्ट केले आहे. त्यामुळे कॅनडामध्ये वास्तव्य असलेल्या खलिस्तान्यांच्या विरोधात येणार्या काळात कॅनडालाही कारवाई करावीच लागेल, असे परराष्ट्र संबंधांच्या तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
सौजन्य झी न्यूज
संपादकीय भूमिकाभारताच्या परराष्ट्रनीतीचाच हा विजय आहे. भारताने अशाच प्रकारे आक्रमक धोरण राबवून खलिस्तान्यांना आश्रय देणार्या देशांवर दबाव आणल्यास खलिस्तानांवर वचक बसवणे भारताला शक्य होईल ! |