मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये जुलै मासामध्ये बेपत्ता झालेल्या मैतेई हिंदु समाजातील २ विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मृतदेहांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. यात २ शस्त्रधारी व्यक्तीही दिसत आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह मात्र अद्याप मिळालेले नाहीत. मृतांपैकी एकाच नाव हिजाम लिनथोइंगबी, तर दुसर्याचे नाव फिजाम हेमजीत आहे.
Months after two Meitei students from Imphal went missing, they have been presumed killed after their photographs surfaced, prompting the #Manipur govt to state that “swift and decisive” action will be taken against the perpetrators
✍️: @BaruahSukrita https://t.co/0c5cPerdK4
— The Indian Express (@IndianExpress) September 26, 2023
या घटनेविषयी मणीपूर सरकारने ट्वीट करून म्हटले की, जुलै २०२३ मध्ये जे २ विद्यार्थी बेपत्ता झाले होते, त्यांच्या मृतदेहांचे छायाचित्र सामाजिक माध्यमातून प्रसारित झाले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे समजते. ‘या हत्या कुणी केल्या?’, याचा शोध आम्ही घेत आहोत. सुरक्षादलांनी संशयितांची धरपकड करण्यास आरंभ केला आहे.
संपादकीय भूमिकामणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ? |