गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !
मानसिक आरोग्य सुदृढ करण्याच्या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद !
पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्राच्या ‘टेली मेंटल हेल्थ’ योजनेच्या अंतर्गत गोवा सरकार ‘टेलीमानस गोवा’ ही योजना राबवत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये या योजनेला प्रारंभ केल्यानंतर आतापर्यंत १ सहस्र लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत विनामूल्य ‘हेल्पलाईन’ सुविधा, मानसिक आरोग्यासंबंधी तज्ञांशी ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून सल्ला घेणे, ‘ई-प्रिस्क्रिपशन’, पाठपुरावा घेणे आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून समुपदेशन सेवा उपलब्ध केली जात आहे.
मोफत सेवा; गोपनीय ठेवले जाते संभाषण https://t.co/Ipe9Qr9QZT#telemanasgoa #goatelemanas #mentalhealth #goanews #goaupdaate #goagovernment #goahealth #healthminister #vishwajitrane
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) September 25, 2023
|
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘टेलीमानस’ योजनेला लाभलेल्या प्रतिसादावरून या योजनेचे महत्त्वही लक्षात येते. अशा प्रकारे आरोग्य सुविधा पुरवणारे गोवा हे एक आदर्श राज्य झाले आहे.’’
Achieving a new milestone, TeleManas Goa receives more than 1,000 calls. It shows the importance of accessible mental health support in the community. #TheGoaModel is making a positive impact! pic.twitter.com/HcOlTjXn6f
— VishwajitRane (@visrane) September 24, 2023
संपादकीय भूमिका
|