दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात पुन्हा विक्रीस ठेवल्या जात असल्याने मूर्तीदान घेणार्या संस्थांवर महापालिकेने लक्ष ठेवावे ! – संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक
मूर्तीदान संकल्पनेला सहकार्य केल्याचा दुष्परिणाम !
पिंपरी (जिल्हा पुणे) – गेल्या २ – ३ वर्षांपासून काहीजण पुष्कळ स्वस्तात श्री गणेशमूर्तींची विक्री करत आहेत. दान घेतलेल्या मूर्ती पुन्हा पुढील वर्षी बाजारात विक्रीस ठेवल्या जात असल्याचे आरोप होऊ लागल्याने महापालिकेने मूर्तीदान उपक्रम घेणार्या संस्थांवर लक्ष ठेवावे. मूर्ती मोशीतील खाणीत विसर्जित होत असल्याची निश्चिती करून घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये बाजारात काही ठिकाणी श्री गणेशमूर्ती अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. या मूर्ती जुन्या आहेत, असे लक्षात आले. मागील वर्षी मूर्तीदानाच्या नावाखाली संकलित केलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. जर असे होत असेल, तर ही गणेशभक्तांची फार मोठी फसवणूक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने याची खातरजमा करून मूर्तीदान उपक्रम घेणार्या संस्था आणि व्यक्तींना समज द्यावी. त्यांनी संकलित केलेल्या मूर्ती पालिकेने कह्यात घेऊन त्यांचे मोशी येथील खाणीत विसर्जन करावे, अशी मागणी संतोष सौंदणकर यांनी पत्रकाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (मुळात खाणीत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे हेही अशास्त्रीय आहे. शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात किंवा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशमूर्तीतील गणेशतत्त्वे पाण्याद्वारे सर्वदूर पसरून चराचर सृष्टीला त्याचा लाभ होतो. त्यामुळे शासनानेच नागरिकांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|