भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !
ठाणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या (ए.टी.एस्.) ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार बनाव करत एका टोळीकडे बनावट रेशनकार्ड बनवून देण्याची मागणी केली. त्यांनी ८ सहस्र रुपयांत शिधापत्रिका देण्याची सिद्धता दर्शवताच पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख या तिघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.