पट्टणकोडोली येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील पैसे यांची चोरी !
३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला
कोल्हापूर – श्री गणेशोत्सव काळात पट्टणकोडोली येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील पैसे यांची सुमारे ३ लाख रुपयांच्या रकमेची चोरी झाली आहे. ही घटना २५ सप्टेंबरला पुजारी पहाटेच्या सुमारास मंदिरात आल्यावर लक्षात आली. हुपरी पोलिसांनी पंचनामा करून पुढील अन्वेषण चालू केले आहे. देवीच्या अंगावरील चांदीचा मुकुट, कमरपट्टा, देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र यांची चोरी करण्यात आली आहे. ( हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक ) काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर शहरात छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेशमूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.