‘शाडू मातीची श्री गणेशमूर्ती आणूया’, असे आवाहन करणार्या कोल्हापूर महापालिकेची श्री गणेशमूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या बाहेर ‘शाडूचा बाप्पा आणूया निसर्गाशी नाते जोडूया’, असे फलकाद्वारे आवाहन केले आहे. असे असतांना कोल्हापूर महापालिकेची श्री गणेशाची मूर्ती मात्र ‘प्लास्टर ऑफ परिस’ची आहे. भाविक आणि श्री गणेशभक्त यांना ‘पर्यावरणपूरक सण साजरे करा’, असे आवाहन महापालिका करते आणि दुसरीकडे मात्र स्वतः त्याच्या उलट भूमिका घेत आहे. ‘त्यामुळे जी महापालिका स्वत:च प्रदूषण रक्षणासाठी उलट भूमिका घेते, नदीत मिसळणार्या ओढे-नाले यांवर काहीच कारवाई करत नाही त्या महापालिकेला भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जित करू नका, असे म्हणण्याचा अधिकार आहे का ?’ असा प्रश्न भाविकांकडून विचारला जात आहे.
संपादकीय भूमिका :कोल्हापूर महापालिकेच्या ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशा वृत्तीमुळे जनता महापालिकेवर विश्वास ठेवणार का ? |