(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे
श्रीमंत कोकाटे यांची जातीयवादी गरळओक !
मुंबई – रामदास हा जातीयवादी आणि वर्णव्यवस्थेचा समर्थक होता. दासबोधामध्ये रामदासाने दलितांविषयी अत्यंत आक्षेपार्ह लिहिले आहे. रामदास हा कधी संत नव्हता, हा महाराष्ट्रातील जंत आहे, अशी जातीयवादी गरळओक कथित इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींपुढे केली. (संत ओळखता येण्यासाठी स्वतः आधी संत असावे लागते. कोकाटे यांच्यासारख्यांनी समर्थ रामदासस्वामींवर अशा प्रकारे अश्लाघ्य भाषेत चिखलफेक करणे, म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे ! – संपादक)
या वेळी कोकाटे म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायामध्ये रामदासाला स्थान नाही. वारकरी संप्रदाय समता, स्त्रियांचा आदर आणि बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो; परंतु रामदासाला हे मान्य नाही. वारकरी संप्रदायामध्ये कधीही मान्य नसलेला हा ब्राह्मणव्यवस्थेचा हस्तक होता.’’ (वारकरी संप्रदायाला काय मान्य आहे आणि नाही ? हे त्या संप्रदायाचे अर्ध्वयु सांगतील. असे बोलून कोकाटे दोन्ही संप्रदायांमध्ये फूट पाडायचे काम करत आहेत. – संपादक)
ते पुढे म्हणाले की,
१. पोटातील जंत हा शरिरासाठी अपायकारक असतो. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणासाठी रामदास अपायकारक आहे. जंत जसा औषधाने काढला जातो, तसा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातून रामदास हद्दपार केला पाहिजे. (कोकाटेंसारख्या हिंदूंमध्ये जातीद्वेषाची दुही माजवणार्यांनाच समाजातून कायमचे हद्दपार केले पाहिजे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक)
२. मुळात शिवसाहित्याच्या महत्त्वाच्या संदर्भांमध्ये रामदास आणि दादोजी कोंडदेव यांचा साधा नामोल्लेखही नाही. समकालीन साहित्यामध्ये त्या दोघांचा नामोल्लेखही नाही, तरीही हे दोघे ब्राह्मण होते; म्हणून त्यांना शिवरायांच्या गुरुस्थानी आणण्यात आले. शिवरायांच्या कार्याचे श्रेय सनातनी व्यवस्थेकडे जावे आणि बहुजन समाजाला गुलाम करता यावे, यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आले. (छत्रपती शिवरायांनी धर्मवीर संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये समर्थ रामदासस्वामी यांचा उल्लेख आढळतो, तसेच छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर समर्थ रामदासस्वामी यांनी धर्मवीर संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रातही शिवरायांचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे; मात्र श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे ब्राह्मणद्वेषी त्यांच्या सोयीनुसार इतिहासाचे संदर्भ देत आहेत. समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ यांचा मन:शांतीसाठी लाभ आजही समाजाला होत आहेत. याउलट कोकाटे यांच्या लिखाणाला समाजमान्यताही नाही. यावरून कोकाटे यांची लायकीही काय आहे, हे लक्षात येते. – संपादक)
(स्त्रोत : Janmat Jagruti)
संपादकीय भूमिका
|