रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या श्री सिद्धिविनायक मूर्तीतील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !
‘महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरात श्री सिद्धिविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्तीची प्रतिष्ठापना आणि गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक काढून ती आश्रमात आणत असतांना मला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीची मिरवणूक काढून तिचे आश्रमात आगमन होत असतांना जाणवलेली सूत्रे
१ अ. श्री सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीच्या मिरवणुकीच्या वेळी ‘चैतन्य दूरवर प्रक्षेपित होत आहे आणि वातावरणातील त्रासदायक स्पंदने नष्ट होत आहेत’, असे जाणवणे : श्री सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक काढून तिचे आश्रमात आगमन झाले. त्या वेळी मीही त्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्या ठिकाणी रांगेत उभी असतांना माझ्या पायात पादत्राणे नव्हती. त्या वेळी ‘भूमीतील चांगली स्पंदने तळपायांतून माझ्या देहात जात आहेत’, असे मला जाणवले. एरव्ही मार्गातून चालतांना ‘त्रासदायक स्पंदने पायांतून माझ्या देहात जात आहेत’, असे मला जाणवते. या प्रसंगी ‘श्री सिद्धिविनायक गणपतीच्या अस्तित्वाने चैतन्य दूरवर प्रक्षेपित होत आहे आणि वातावरणातील त्रासदायक स्पंदने नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले.
१ आ. ‘मिरवणुकीच्या वेळी श्री गणेशतत्त्वाचे लाल रंगाचे सूक्ष्म कण आसमंतात वरपर्यंत पसरले आहेत’, असे दिसणे : ‘मिरवणुकीत सहभागी झालेल्या साधकांच्या भोवती गणेशतत्त्वाचे लाल रंगाचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले. ‘मिरवणुकीवर श्री गणेशतत्त्वाचे लाल रंगाचे सूक्ष्म कण आसमंतात वरपर्यंत पसरले आहेत’, असे मला दिसले. ‘मिरवणूक ज्या मार्गातून जात होती, तो मार्ग ते आश्रम येथपर्यंत दैवी लाल कणांची सूक्ष्मातून एक वाट सिद्ध झाली’, असे मला दिसले.
१ इ. मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही थकवा न जाणवणे आणि ‘श्री सिद्धिविनायकाने शक्ती प्रदान केली’, असे वाटणे : मला एका साधिकेने मिरवणुकीत सहभागी होण्याविषयी विचारले. त्या वेळी मला वाटत होते, ‘मी मिरवणुकीत चालू शकेन कि नाही’; मात्र मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही मला थकवा जाणवला नाही. त्या वेळी ‘श्री सिद्धिविनायक गणपतीनेच मला शक्ती प्रदान केली’, असे मला वाटले. मिरवणुकीत सहभागी होऊन आश्रमात आल्यावर माझ्यावरील त्रासदायक आवरण नष्ट झाले. माझा चेहरा पुष्कळ ताजातवाना आणि उत्साही वाटत होता.
२. प्रतिष्ठापनेची सिद्धता चालू असतांना अनुभूती येणे
२ अ. श्री सिद्धिविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नसूनही त्याच्या अस्तित्वाची अनुभूती येणे : मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणची सिद्धता पूर्ण झाली नव्हती, तरीही ‘त्या ठिकाणी पाहिल्यावर माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवत होतेे. ‘गणपतीची मूर्ती नसतांनाही माझ्यावर उपाय होत आहेत ’, असे मला जाणवले.
२ आ. ‘गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असलेल्या ठिकाणाहून येणार्या चैतन्याचा सूक्ष्मातील परिणाम केवळ आश्रमाच्या आवारात होत नसून दूर अंतरापर्यंत होत आहे’, असे जाणवणे : एकदा मी श्री सिद्धिविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असलेल्या ठिकाणाहून दूर असलेल्या आश्रमातील कमळपिठाच्या जवळ उभी होते. त्या वेळी ‘प्रतिष्ठापना होणार असलेल्या ठिकाणाहून चांगली शक्ती येत आहे आणि माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ढेकराही येत होत्या. याप्रसंगी मी अभ्यासाच्या दृष्टीने आणखी मागे आश्रमाच्या संरक्षण भिंतीपर्यंत गेले. तेव्हाही मला ढेकरा येत होत्या. प्रतिष्ठापनेचे ठिकाण ते संरक्षण भिंतीपर्यंतचे अंतर ४० मीटर इतके आहे. त्या वेळी मला जाणवले, ‘प्रतिष्ठापनेच्या ठिकाणाहून येणार्या चैतन्याचा सूक्ष्मातील परिणाम केवळ आश्रमाच्या आवारात होत नसून त्याचा परिणाम दूर अंतरापर्यंत होत आहे.’
३. माझ्या लक्षात आले, ‘मला या अनुभूती गणपतीच्या मूर्तीची स्थापना झाली नसतांनाही आल्या. महर्षींची आज्ञा आणि आशीर्वाद, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् आशीर्वाद आणि संतांचा संकल्प यांमुळे तेथे त्या देवतेचे चैतन्य निर्गुण स्वरूपात कार्यरत आहे.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|