काही शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात ! – पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

भोपाळ (मध्यप्रदेश) – काँग्रेसने इच्छाशक्ती गमावली आहे. काँग्रेसचे तळागाळात पोचलेले नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. काँग्रेस हा पक्ष आता काँग्रेसचे नेते चालवत नाहीत. काँग्रेस हे एक आस्थापन झाले आहे. काँग्रेसच्या घोषणांपासून धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी आयात केल्या जात आहेत. काँग्रेसचा ठेका आता काही शहरी नक्षलवाद्यांकडे आहे. काँग्रेसमध्ये आता शहरी नक्षलवाद्यांचे चालते. काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना आता जाणवू लागले आहे की, त्यांचा पक्ष भूमीवर पोकळ झाला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्यप्रदेशात दीर्घकाळ काँग्रेसचीच सत्ता होती; परंतु या काळात काँग्रेसने नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा मध्यप्रदेश राज्याला ‘आजारी’ राज्य बनवले. काँग्रेसच्या काळात मध्यप्रदेशात घोटाळ्यांचे विक्रम झाले. मतपेढी आणि तुष्टीकरण यांचे राजकारण करणार्‍या या पक्षाला पुन्हा मध्यप्रदेशात संधी मिळाली, तर राज्याची आणखी हानी होईल. काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेश राज्याला ‘आजारी’ राज्य बनवेल.

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर सरकारने काँग्रेसवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, असेच जनतेला वाटते !