कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत नाझी सैन्याधिकार्याचा टाळ्या वाजवून केला सन्मान !
विरोध होऊ लागल्यावर संसदेच्या अध्यक्षांनी मागितली क्षमा !
ओटावा (कॅनडा) – गेल्या आठवड्याभरापासून युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की कॅनडाच्या दौर्यावर आहेत. ते २४ सप्टेंबरला कॅनडाच्या संसदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दुसर्या महायुद्धात नाझी सैन्याच्या बाजूने लढणार्या एका ज्येष्ठ अधिकार्याचा उभे राहून टाळ्या वाजवत सन्मान केला. यामुळे विरोधी पक्षनेते पायरे पॉलिवरे यांनी ट्रुडो यांना विरोध केला. त्यांनी ट्वीट करून म्हटले, ‘ट्रुडो यांच्या पक्षाने झेलेंस्की यांच्या भेटीच्या वेळी संसदेत नाझी अधिकार्याचा सन्मान करण्याचे नियोजन केले; पण यात मुख्य चूक जस्टिन ट्रुडो यांचीच आहे; कारण संसदेमध्ये एखाद्या अतिथीचा सन्मान करायचा असल्यास त्याचे नियोजन पंतप्रधान कार्यालयाकडून केले जाते.’ या प्रकरणामुळे देशातील वातावरण तापत असल्याचे पाहून संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी देशातील आणि जगभरातील ज्यू समुदायाची क्षमा मागितली.
सौजन्य इंडिया टूडे
संपादकीय भूमिका‘नाझी, खलिस्तानी, गुंड आदींचे समर्थन करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जगातील एकमेव पंतप्रधान म्हणजे जस्टिन ट्रुडो’, अशीच यापुढे त्यांची ओळख निर्माण होईल ! |