पंचगंगेवर होणार्या आरतीसाठी हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती !
कोल्हापूर – २३ सप्टेंबरला भाविकांनी प्रशासनाचे बंधन झुगारून देऊन उत्स्फूर्तपणे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. यानंतर पंचगंगा नदीवर प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता होणार्या पंचगंगेच्या आरतीसाठी तेथील भाविक श्री. स्वप्नील मुळे यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांना आरतीसाठी उपस्थित राहून सहभागी होण्याविषयी विनंती केली. श्री. स्वप्नील मुळे हे गेली अनेक वर्षे निष्ठेने ऊन, वारा, पाऊस यांसह प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत ही आरती करत आहेत.
या प्रसंगी श्री. स्वप्नील मुळे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, श्री. प्रमोद सावंत, भष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, श्री. गणेश नरके, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. प्रथमेश गावडे यांसह अन्य भाविक उपस्थित होते.