पसार १९ खलिस्तानी आतंकवाद्यांची संपत्ती होणार जप्त !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याची संपत्ती जप्त केल्यानंतर अन्य पसार खलिस्तानी आतंकवाद्यांची सूची बनवली आहे. यात १९ आतंकवाद्यांचा समावेश आहे. या खलिस्तानी आतंकवाद्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. आता या सर्व पसार आतंकवाद्यांची संपत्ती अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३३ (५) अंतर्गत जप्त करण्यात येणार आहे.