आमदारांच्या पात्रतेविषयीच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची काँग्रेसची मागणी !
मुंबई – शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रेच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात परस्परविरोधी याचिका करण्यात आल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर विधीमंडळाने निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयीची पहिली सुनावणी घेतली.
लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. https://t.co/WOf8HtojQM
— Saamana (@SaamanaOnline) September 24, 2023