पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !
पुणे – शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांचे देखावे पहाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या गर्दीचा अपलाभ घेत सतीश हिरेकेरुर या भ्रमणभाष चोरट्यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ भ्रमणभाष जप्त केले आहेत. हिरेकेरुर हा सराईत गुन्हेगार आहे. (सराईत गुन्हेगाराला त्या त्या वेळी कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम ! – संपादक) त्याच्याकडून १४ दुचाकी वाहने आणि घरफोडीतील वस्तू असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर १२ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देखावे पहाण्यासाठी आलेल्या नागरिकांचे भ्रमणभाष किंवा इतर वस्तू चोरणार्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके सिद्ध केली आहेत. त्या पथकांकडून हिरेकेरुर याला पकडण्यात आले आहे.
पुणे!
गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले.चोरट्याकडून 31 मोबाइल संच जप्त करण्यात आले.
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) September 24, 2023
संपादकीय भूमिकाजनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी ! |