नातेवाइकांना साधनेत साहाय्य करणार्या आणि परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे !
१. नातेवाइकांना साधनेत साहाय्य करणे
‘पूर्वी सौ. राधा सासरी मिळूनमिसळून रहायची नाही. आता ती सासरच्या लोकांना सत्संग ऐकायला सांगून त्याप्रमाणे ‘साधनेच्या संदर्भातील कृती कशा करायच्या ?’, याविषयी सांगते. ती त्यांच्याकडूनही साधना करून घेते. ती तिच्या माहेरच्या लोकांनाही साधनेतील पुढचे टप्पे सांगून साधनेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते.
२. स्वीकारण्याची वृत्ती
पूर्वी राधाला तिच्या चुका सांगितल्यास तिला वाईट वाटायचे. आता तिचा चुका स्वीकारण्याचा भाग वाढला आहे. ती मला स्वतःहून तिच्याकडून झालेल्या चुका सांगून ‘कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी विचारते.
३. पूर्वीच्या तुलनेत आता राधाची शिकण्याची वृत्ती वाढली आहे. तिच्यात सेवा परिपूर्ण करण्यासाठी भाव आणि तळमळ वाढली आहे.
४. राधाच्या बोलण्यात गोडवा जाणवतो.’
– श्री. घनश्याम गावडे (सौ. राधा यांचे यजमान, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२१)
सौ. राधा गावडे यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !१. ‘आध्यात्मिक पातळी ६० टक्के व्हावी’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा सेवेतून आनंद मिळण्याकडे लक्ष देणे‘पूर्वी माझ्या मनात ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के व्हावी’, असा विचार असायचा. आता माझ्या मनात ‘देवाची परिपूर्ण सेवा करून देवाकडे जायचे आहे’, असा विचार असतो. ‘परिपूर्ण सेवा, म्हणजे आनंद आहे आणि तो मला सातत्याने मिळाला पाहिजे’, असे मला वाटते. २. स्वतःत समष्टी भाव वाढण्यासाठी प्रयत्न करणेपूर्वी ‘माझ्यामध्ये देवाप्रती भाव वाढायला हवा’, असे मला वाटायचे. आता ‘माझ्यात समष्टी भाव वाढायला हवा’, असे मला वाटते. ‘सर्व साधकांचा विचार करून केलेली सेवा देवाला अधिक आवडेल’, असा विचार करून माझा सेवा करण्याचा प्रयत्न असतो. ३. स्वतःकडून झालेल्या चुका समजल्यावर कृतज्ञता वाटणेपूर्वी माझ्याकडून चुका झाल्यास मला ताण यायचा. मला भीती वाटायची आणि माझ्या मनात प्रतिमेविषयी विचार यायचे. आता कुणी माझ्या चुका सांगितल्यास मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते. मला वाटते, ‘माझ्यातील स्वभावदोष कळले की, मला प्रयत्न करायला सोपे जाईल.’ – सौ. राधा गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२१) |