परमकृपाळू गुरुमाऊली ।

‘वर्ष २००८ मध्‍ये आध्‍यात्मिक त्रासाच्‍या तीव्रतेमुळे मी काहीच करू शकत नव्‍हतो. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एका सेवेसाठी कागद कापण्‍याची सेवा मला दिली होती. त्‍या कागदांमध्‍ये काही वेळा पाठकोरे कागदही येत होते. २- ३ वेळा चुकीची जाणीव करून दिल्‍यानंतर प.पू. डॉक्‍टरांनी मला ही चूक फलकावर लिहिण्‍यास सांगितली. आज तो प्रसंग आठवल्‍यानंतर माझी भावजागृती झाली. तेव्‍हा मला येथे दिलेले कृतज्ञतापर काव्‍य सुचले.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परमकृपाळू गुरुमाऊली ।
आठविता तुमची थोरवी ॥

श्री. धैवत वाघमारे

मनासी येई अनुभूती ।
भावस्‍पर्शाची ॥ १ ॥

होतो मी अतिदीन ।
नव्‍हते त्राण अंगी ॥
शुद्ध नव्‍हती कशाची ।
दिनरात सरती ग्‍लानीत ॥ २ ॥

ऐसे समयी दिधली सेवा एक ।
दिसे साधी जरी अपेक्षित तुम्‍हा ॥
लक्षपूर्वक व्‍हावी मजकडून ।
वारंवार करे मी तीच चूक पुनःपुन्‍हा ॥ ३ ॥

निरोप धाडिला तुम्‍ही ।
चूक लिहावी फलकावरी ॥
तरच होईल प्रायश्‍चित्त तव चुकीचे ।
म्‍हणूनी चूक लिहिली सत्‍वरी ॥ ४ ॥

गुरुमाऊलीस कळे स्‍थिती लेकराची ।
जरी होई प्रसंगी कठोर ॥
समजूनी घेई आपुल्‍या लेकरांस ।
आठविता तो क्षण कृतज्ञताभाव होई जागृत ॥ ५ ॥

गुरुमाऊलीची थोरवी ।
कैसी वर्णावी म्‍यां पामराने ॥
त्राता सर्व जगताचा ।
लाभला तव रूपाने ॥ ६ ॥

कृतज्ञ मी, कृतज्ञ मी ।
आजही स्‍मरता तव कृपेचे क्षण ॥
येई उत्‍साह मनासी ।
जो देई नवदिशा मम जीवनासी ॥ ७ ॥

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक