चीनकडून पाकला निकृष्ट दर्जाच्या कोळशाची निर्यात !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आधीच अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडलेल्या पाकला त्याचाच मित्र देश असलेल्या चीनने फसवले आहे. पाकच्या ‘नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युुलेटरी अॅथॉरिटी’, म्हणजेच ‘नेप्रा’ या सरकारी आस्थापनाने चीनच्या विद्युत् आस्थापनांच्या फार मोठ्या हेराफेरीचा भांडाफोड केला आहे. पाकमध्ये वीज बनवण्यासाठी आवश्यक कोळसा चीनकडून पुरवला जातो. ठरलेल्या कोळशाच्या गुणवत्तेपेक्षा पुष्कळ अल्प गुणवत्तेचा कोळसा चीनकडून पाकला पुरवला जातो. याचे पैसे मात्र निर्धारित गुणवत्तेच्या कोळशाच्या मूल्यानुसार अब्जावधी रुपयांमध्ये वसूल केले जात आहेत.
१. चिनी आस्थापनांनी पाकला ६ सहस्र ‘सीव्ही’ (कॅलॉरिफिक व्हॅल्यू) या गुणवत्तेचा कोळसा पुरवण्याचे अपेक्षित असतांना अत्यंत खालच्या दर्ज्याचा कोळसा पुरवला जात आहे.
२. ‘नेप्रा’ने आरोप केला की, चीनकडून येत असलेल्या कोळशाच्या एकाही पुरवठ्यामध्ये चांगल्या प्रतीचा कोळसा आलेला नाही.
३. पाकने चीनकडून घेतलेल्या कर्जातून कोळशावर चालणार्या ६ सहस्र ७७७ मेगावॅटच्या विद्युत् निर्मिती यंत्रांची निर्मिती केली आहे. चिनी आस्थापनेच ही यंत्रे चालवतात आणि त्यासाठी लागणारा कोळसाही तेच आयात करतात. या विद्युत् प्रकल्पाच्या माध्यमातून पाकला चीनच्या तब्बल ६४३ अब्ज रुपयांच्या (५३ लाख ४३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) कर्जाची परतफेड करायची आहे.
४. अशातच वीजेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक वेळा पाकमध्ये निषेध आंदोलने होत असतात.
संपादकीय भूमिका
|