ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ध्वनीक्षेपकावर श्री गणेशाची आरती लावल्याने धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण
४ जण घायाळ
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथील प्रजापती मोहल्ल्यामध्ये गणेशोत्सवाच्या मंडपात ध्वनीक्षेपकावरून श्री गणेशाची आरती लावल्यावर शेजारी रहाणारे सलमान, छोटु खान, इरफान, परवेज आणि अन्य काही मुसलमान यांनी तलवार अन् काठी घेऊन येथील हिंदूंवर आक्रमण केले. यात १ महिला, १ मुलगा आणि अन्य २ जण, असे ४ हिंदु घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सध्या येथे बंदोबस्त ठेवला आहे.
प्रजापती मोहल्ल्यामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि मोहरम या कालावधीत नेहमीच येथे वाद होऊन तणाव निर्माण होत असतो.
संपादकीय भूमिका
|