सनातन धर्मविरोधी वक्तव्य करणार्या नेत्यांवर कारवाई करा !
‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये संतप्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माला नष्ट करण्याची गोष्ट करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या असून परिणामी संपूर्ण देशात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या तिघांवरही द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शास्त्री घाट, वरुणा पुलावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ केले.
वाराणसी में हिन्दू राष्ट्र जागृति आंदोलन में हिन्दू संगठनों की संतप्त मांग !
सनातन धर्म पर अत्यंत आक्षेपजनक वक्तव्य करनेवाले मंत्री उदयनिधि स्टालिन, मंत्री प्रियांक खडगे, सांसद ए. राजा इन्हें तत्काल गिरफ्तार करके उनका मंत्रीपद छीन लिया जाए !@OpIndia_in @JagranNews @hindupost pic.twitter.com/3QInPGDZoF
— Vishwanath Kulkarni (@vishwanathkul) September 17, 2023
या वेळी वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अजित सिंह बग्गा, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष पांडे, वाराणसी व्यापारी मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश निरंकारी, विश्वेश्वरगंज व्यापारी मंडळाचे भगवान दास जायस्वाल, पंचचक्र हनुमान चालिसा संघटनेचे राजकुमार पटेल, संस्कृति रक्षा मंचाचे संयोजक रवि श्रीवास्तव, महावीर सेनेचे अरविंद गुप्ता, अखिल भारतीय सनातन समितीचे अध्यक्ष डॉ. अजय जायसवाल, तरना चमावचे माजी प्रमुख जयप्रकाश सिंह, रुद्र शक्ती सेवाच्या जिल्हाध्यक्षा सोनी तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे राजन केसरी आदी उपस्थित होते.