बस्ती (उत्तरप्रदेश) येथे घरात घुसून महिलेवर दोघांकडून सामूहिक बलात्कार
या घटनेमुळे पीडित महिला आणि तिचे पती यांची आत्महत्या
बस्ती (उत्तरप्रदेश) – येथे एका विवाहितेवर २ जणांनी मध्यरात्री घरात घुसून सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेसह पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. आदर्श (वय २५ वर्षे) आणि त्रिलोकी (वय ४५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. मृत जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आणि त्यात त्यांनी आरोपींची नावे सांगितली होती. या जोडप्याला ८ आणि ६ वर्षांची २ मुले आणि एक वर्षाची १ मुलगी आहे. भूमीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून हा सामूहिक बलात्कार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Hours after wife’s gang rape, UP couple dies by consuming poison#UttarPradeshhttps://t.co/mzCzyjEflR
— IndiaToday (@IndiaToday) September 24, 2023
संपादकीय भूमिकाअशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |