लाहोर (पाकिस्तान) येथे ३ मास बलात्कार करणार्या वडिलांना अल्पवयीन मुलीने गोळ्या झाडून केले ठार !
लाहोर (पाकिस्तान) – येथील गुज्जरपुरा भागात एका १४ वर्षांच्या मुलीने स्वतःच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ३ मासांपासून वडील तिच्यावर बलात्कार करत होते. या अत्याचाराला कंटाळून तिने वडिलांची त्यांच्याच बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. ‘याप्रकरणी सर्व गोष्टींचे अन्वेषण करून संशयित मुलीवर गुन्हा नोंदवला जाईल’, अशी माहिती अन्वेषण अधिकारी सोहेल काझमी यांनी दिली.
विशेष म्हणजे अन्य एका प्रकरणात पाकिस्तानच्या एका न्यायालयाने २ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेनंतर हे प्रकरण समोर आले आहे. (या दोन घटना आज समाजासमोर आल्या आहेत, समाजासमोर न आलेल्या घटना किती असतील, याची कल्पनाच करता येत नाही ! केवळ पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातही असे घडत असल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
पिता ने नाबालिग बेटी का किया रेप, पीड़िता ने गोली मारकर कर दी हत्याhttps://t.co/HYrfDD6dKZ
— Hindustan (@Live_Hindustan) September 24, 2023
संपादकीय भूमिकाअसे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते ! |