पंजाबमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेले साडेतीन कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !
अमृतसर (पंजाब) – पाकिस्तानच्या एका ड्रोनने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध घेऊन हे ड्रोन कह्यात घेतले. या ड्रोनमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते. याचे मूल्य साडेतीन कोटी रुपये इतके आहे. महवा या गावामध्ये हे ड्रोन कह्यात घेण्यात आले.
BSF finds Pakistani drone carrying heroin in Punjab’s Amritsarhttps://t.co/zHNlcZ0vIc
— Dynamite News (@DynamiteNews_) September 24, 2023
गेल्या काही मासांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी कह्यात घेतलेले हे चौथे ड्रोन आहे. पाकिस्तानी तस्कर आता छोट्या ड्रोनमध्ये अल्प वजनाचे हेरॉईन ठेवून भारतात पाठवत आहेत. छोट्या ड्रोनचा आवाज अल्प येतो आणि तो कमी उंचीवरून उडतो. त्याची किंमतही अल्प आहे.