देशात ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ गाड्यांना प्रारंभ

११ राज्यांत धावणार !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत. या गाड्या चालू झाल्याने त्या ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २-३ घंट्यांनी अल्प होणार आहे. सध्या देशातील २५ रेल्वे मार्गांवर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ गाड्या धावत आहेत.

नवीन गाड्यांचा तपशील

१. कासारगोड – थिरूवनंतपूरम् (केरळ)
२. जयपूर – उदयपूर (राजस्थान)
३. विजयवाडा – रेनिगुंटा – चेन्नई (आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू)
४. तिरुनेलवेली – मदुराई – चेन्नई (तमिळनाडू)
५. जामनगर – कर्णावती (गुजरात)
६. रांची – हावडा (झारखंड आणि बंगाल)
७. भाग्यनगर – बेंगळुरू (तेलंगाणा आणि कर्नाटक)
८. राउरकेला – पुरी (ओडिशा)
९. पाटणा – हावडा (बिहार आणि बंगाल)