शांत, आनंदी आणि प्रेमळ स्वभाव असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा खेडशी (जिल्हा रत्नागिरी) येथील चि. नीलांश विरुपाक्ष एंडिगिरी (वय ३ वर्षे) !
(नीलांश म्हणजे भगवान शिवाचा अंश)
२५.९.२०२३ या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल एकादशीला चि. नीलांश विरुपाक्ष एंडिगिरी याचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. नीलांश विरुपाक्ष एंडिगिरी याला वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून अनेक आशीर्वाद !
१. सौ. भाग्यश्री विरूपाक्ष एंडिगिरी (चि. नीलांशची आई), खेडशी, रत्नागिरी.
१ अ. जन्मापूर्वी
१ अ १. गर्भारपणात आध्यात्मिक उपाय आणि नामजप करता येणे : ‘बाळ पोटात असतांना कोरोना महामारीचा काळ होता. त्या काळात प.पू. डॉक्टरांनी माझ्याकडून नामजप आणि उपाय करून घेतले. कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त हे नामजप करणे; कापूर, अत्तर, उदबत्ती यांचा आध्यात्मिक उपायांसाठी वापर करणे, हेसुद्धा माझ्याकडून न चुकता होत होते. घरातही पुष्कळ प्रसन्न वाटत होते. या आधी माझ्याकडून असे आध्यात्मिक उपाय आणि नामजप होत नव्हते.
१ अ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना एरव्ही बसल्यामुळे होणारा शारीरिक त्रास न होणे : त्या वर्षी प.पू. गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहायला मिळणार; म्हणून मन पुष्कळ प्रसन्न होते. कार्यक्रम पहातांना एका जागेवरच बसून होते; पण मला काही त्रास झाला नाही. एरव्ही थोडा वेळ जरी बसले, तरी पाठ आणि कंबर दुखायची.
१ अ ३. दूरदर्शनसंचावरील महाभारत मालिका ‘बाळसुद्धा ऐकत आहे’, असे जाणवणे : त्या वेळी आम्ही प्रतिदिन दूरदर्शन संचावर ‘महाभारत’ ही मालिका पहात होतो. त्या वेळी मला पोटात काही हालचाल झाल्याचे जाणवायचे. त्या वेळी ‘बाळसुद्धा महाभारत ऐकत आहे’, असे मला वाटायचे. महाभारत केवळ शनिवारी आणि रविवारी असायचे. त्याच वेळी त्याची पुष्कळ हालचाल जाणवायची.
१ आ. जन्मानंतर
१ आ १. तो झोपल्यानंतर त्याने हाताच्या मुद्रा केल्याचे दिसते.
१ आ २. आनंदी : ‘तो कधीही पुष्कळ रडला आहे’, असे झाले नाही. त्याचा मोठा भाऊ (चि. वेदांत एंडिगिरी आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) त्याच्यासह खेळत असतांना तो पुष्कळ हसत असे.
१ इ. वय १ ते २ वर्षे
१ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून पहिला शब्द त्यांना ‘बाबा’, असे म्हणणे : नीलांश पुष्कळ उशिरा बोलू आणि चालू लागला. (सर्वसाधारण लहान मुले १३ ते १५ व्या मासात आधाराविना चालू शकतात आणि ६ मासांनंतर एकेरी अक्षर, तर १२ मासांनंतर अर्थपूर्ण शब्द बोलू शकतात.) तो जिथे झोपायचा, तेथे त्याच्या डोक्यावरील भिंतीवर प.पू. डॉ. बाबांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दैनिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्र लावले होते. एकदा तो ते छायाचित्र पाहून ‘बाबा’ असे म्हणाला. तेव्हा मला पुष्कळ आनंद होऊन माझी भावजागृती झाली. त्या वेळेपर्यंत तो आणखी काहीही बोलत नव्हता.
१ इ २. शांत आणि हसरा स्वभाव : तो जन्मल्यापासून पुष्कळ शांत आणि हसर्या स्वभावाचा आहे. त्याच्या हातून लहान – मोठे कुणीही खेळणी काढून घेतली, तरी तो शांतच असायचा आणि कधी रडला नाही. नेहमी आनंदी आणि हसतमुख असतो.
१ इ ३. इंग्रजी चित्रपट आणि मालिका पहातांना मुले रडत असल्यामुळे ते पहाणे बंद होणे : आमच्या घरात आम्ही इंग्रजी चित्रपट आणि मालिका इत्यादी पहायचो; पण या दोघांचा जन्म झाल्यापासून आम्हाला ते दोघे पाहू देत नाहीत. मालिका लावली की, रडून गोंधळ करतात. त्यामुळे आम्ही ते पाहणे सोडून दिले. गुरुदेवांनीच या दोघांच्या माध्यमातून घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे बंद केले.
१ ई. वय २ ते ३ वर्षे
१ ई १. प्रेमळ : नीलांशचा स्वभाव प्रेमळ आहे. त्याला त्याच्या आजीला खाऊ दे; म्हणून एकदा सांगितले. तेव्हापासून त्याला खाऊ मिळताच तो आधी आजीला नेऊन देतो.
त्याला खाऊ दिल्यावर घरात कुणी आले असल्यास तो त्यांनाही खाऊ देतो. पदार्थ एकच असेल, तर त्याचे तुकडे करून देतो.
१ ई २. नीटनेटकेपणा : तो त्याने घेतलेली वस्तू पुन्हा त्याच जागी व्यवस्थित नेऊन ठेवतो. त्याला कपड्यांच्या घड्या घातलेले आवडते. तो ते तसेच ठेवू देत नाही. बसायला घेतलेली चटई आणि झोपतांना घातलेले अंथरूण व्यवस्थित नसेल, तर तो ते व्यवस्थित करतो.
१ ई ३. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे.
१ ई ४. ऐकण्याची वृत्ती : त्याला एखादी गोष्ट समजावून सांगितल्यावर, म्हणजेच एखादी गोष्ट घेऊ नको किंवा काही खाऊ नको, असे सांगितल्यावर तो लगेच ऐकतो.
१ ई ५. सात्त्विकतेची आवड : बाहेर जाऊन आल्यावर गोमूत्र (तीर्थ) शिंपडायला सांगतो. सर्वांना विभूती लावायला सांगितल्यावर तो सर्वांना विभूती लावतो. अंघोळीनंतर देवापुढे साष्टांग दंडवत घालतो. मी मंत्र म्हटल्यावर माझ्यानंतर तुटक शब्दांत ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. ॐ, दत्त हे शब्द स्पष्ट उच्चारतो.
१ उ. स्वभावदोष : थोड्या प्रमाणात हट्टीपणा करतो, नामजप अल्प करतो, काही गोष्टी ऐकत नाही.’
२. श्रीमती चन्नबसम्मा ईरण्णा जंगम (नीलांशची आजी (आईची आई) वर्ष २०२१ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे))
२ अ. ‘एकदा नामजप करत असतांना ‘देवाने त्याच्या डोक्यावर फुले ठेवली आहेत. त्यानंतर ती फुले खाली पडत आहेत’, असे मला जाणवले.
२ आ. मुद्रा करून उपाय करणे : मी नामजप करतांना माझे पाहून मी केली तशी मुद्रा करतो, तसेच मी केलेल्या मनोरा मुद्रा आणि हस्त मुद्रा पाहून त्यानेसुद्धा केल्या.’
३. कु. शांता जंगम (नीलांशची मावशी), चिपळूण, सावर्डे, रत्नागिरी.
अ. ‘नीलांश नेहमी हसतमुख असतो.
आ. ‘त्याच्याकडे पहातच रहावे, तसेच हा उच्च लोकातून आला आहे’, असे मला वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३१.७.२०२३)
|