नाशिक येथे रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची लूटमार !
रेल्वे सुरक्षा बल पोलिसांकडून एकाला अटक !
नाशिक – नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करणार्या संशयितांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी येथील रफिक महम्मद नाईक याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ७ सहस्र ५०० रुपयांची ताजी तिकिटे आणि २३ सहस्र ४१९ किमतीची १६ जुनी तिकिटे, असा अनुमाने ३० सहस्र रुपयांचा माल रफिक याच्याकडून जप्त केला. प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट काढतांना अनुचित प्रकार, तर होत नाही ना याची खात्री करावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बल पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Nashik News : नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोलिसांनी रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या संशयिताचा पर्दाफाश केला आहे.https://t.co/K4C58drdaF#Nashik #NashikNews
— ABP माझा (@abpmajhatv) September 20, 2023
एकीकडे गणेशोत्सव चालू झाल्यानंतर रेल्वेने गावी जाणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे, तसेच रेल्वेचे आरक्षण पूर्ण भरले आहे. अनेक प्रवासी अंतिम तिकीट मिळवण्यासाठी धडपडत असतात; मात्र बाजारात रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी रफिक हा गरजू प्रवाशांना हेरून त्यांची फसवणूक करत होता. रफिक भ्रमणभाषच्या माध्यमातून हा काळाबाजार करत होता. तो भ्रमणभाष ‘ॲप’चे साहाय्य घेत होता. पोलिसांनी या सर्व व्यवहारासाठी वापरत असलेला भ्रमणभाष जप्त केला आहे. प्रवाशांना तिकिटांच्या काळ्या बाजाराविषयी काही माहिती असल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा बलाशी अथवा रेल्वेच्या प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |