अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. कलेशी संबंधित उपलब्ध सेवा
१ अ. प्रसारसाहित्य
१. ‘प्रसारासाठी आवश्यक भित्तीपत्रके, प्रबोधनपर पत्रके, फलक, ‘डँगलर्स’ आदी बनवणे
२. सनातन-निर्मित १७ भाषांतील ग्रंथांची माहितीपत्रके बनवणे
३. सात्त्विक उत्पादनांच्या वेष्टनांसाठीच्या कलाकृती बनवणे
४. प्रसारासाठी साहाय्यक पंचांग, वह्या, भेटसंच, छत्री, टोपी इत्यादी उत्पादनांच्या कलाकृती बनवणे
५. विविध प्रसारसाहित्य, उदा. पंचांग, ग्रंथ यांसाठी मिळणार्या विज्ञापनांची रचना करणे
(आवश्यक कौशल्य : कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप)
१ आ. विविध कलाकृतींसाठी लिखाण करणे आणि त्याचे वर्गीकरण करणे
१. विविध कलाकृती, प्रसारसाहित्य आणि उत्पादनांची वेष्टने यांच्यासाठी लिखाण सिद्ध करणे
२. विविध उपक्रम आणि कार्यक्रम यांसाठी काढलेल्या संबंधितांना भेट देण्यासाठीच्या २ सहस्र छायाचित्रांसाठी छायाचित्र ओळी (कॅप्शन्स) करणे
३. कलेविषयी प्रकाशित करायच्या ग्रंथांच्या दृष्टीने कलेच्या संदर्भात केलेल्या विविध प्रयोगांचे लिखाण करणे
४. आतापर्यंत विविध कलाकृतींमध्ये प्रकाशित झालेल्या ४ सहस्र धारिकांमधील लिखाणाचे विषयांनुरूप वर्गीकरण करणे आणि त्यांना संकेतांक देणे
१ इ. ग्रंथ मुखपृष्ठ
१. नवीन ग्रंथांच्या मुखपृष्ठासाठी संकल्पना / आराखडे बनवणे
२. ‘फोटोशॉप’मध्ये मुखपृष्ठ बनवणे
३. सर्व भाषांतील पुनर्मुद्रणाचे ग्रंथ छपाईला पाठवण्यासाठी सिद्ध करणे (प्रतिमास ३५ ग्रंथ )
४. अनुमाने ४ सहस्र आगामी ग्रंथांची मुखपृष्ठे बनवणे, तसेच त्यांचे विषय समजायला सोपे व्हावे; म्हणून आवश्यकतेनुसार लिखाणाशी संबंधित रेखाचित्रे बनवणे
(आवश्यक कौशल्य : फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ)
१ ई. छायाचित्र संस्करण
१. विविध उपक्रम आणि कार्यक्रम यांवेळी काढलेल्या संबंधितांना भेट देण्यासाठीच्या २ सहस्र छायाचित्रांवर संस्करण करणे
२. दोन सहस्र छायाचित्रांचे वर्गीकरण करणे
३. अंतिम झालेली छायाचित्रे मूळ साठ्यात जमा करणे
(आवश्यक कौशल्य : फोटोशॉप)
१ उ. सूक्ष्म-चित्रे
१. सूक्ष्म-चित्रकारांनी काढलेली ७ सहस्रांहून अधिक चित्रे ग्रंथ आणि दैनिक यांमध्ये प्रकाशित करण्यासाठी त्यांवर संगणकीय संस्करण करणे
२. १५ सहस्र सूक्ष्म-चित्रांच्या मूळ साठ्याची आणि त्यांच्या संगणकीय धारिकांची विषयानुरूप विभागणी करणे अन् त्यांना संकेतांक देणे
(आवश्यक कौशल्य : फोटोशॉप आणि कोरल)
१ ऊ. चित्र संस्करण
१. ध्वनी-चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या चित्रांवर संस्करण करणे
२. यापूर्वी केलेली अनुमाने १४ सहस्र चित्रे मूळ साठ्यात ठेवण्यासाठी त्यांवर आवश्यक ते संस्करण करणे
३. रांगोळी, मेंदी, दागिने आदी नक्षींच्या १ सहस्र ५०० संगणकीय धारिकांचे वर्गीकरण करणे
४. आरंभीपासून केलेल्या देवतांच्या चित्रांच्या १ सहस्र २०० संगणकीय धारिकांचा अभ्यास करून त्यांचे टप्पे इतिहास म्हणून संरक्षित करणे आणि त्यांवर तशी माहिती लिहिणे
(आवश्यक कौशल्य : फोटोशॉप)
१ ए. संदर्भचित्र साठा
१. ५० सहस्र चित्रांच्या संगणकीय साठ्यामधील अनावश्यक आणि कालबाह्य चित्रे पुसणे अन् आवश्यक चित्रांना संगणकीय संकेतांक देणे
२. नवीन आलेली आणि अद्ययावत् केलेली चित्रे संगणकीय संकेतांक देऊन मूळ साठ्यात जमा करणे
३. विविध ठिकाणांहून जमलेल्या सात्त्विक, पौराणिक, ऐतिहासिक, देवता, राजे आणि राष्ट्रपुरुष यांच्या ३ सहस्रांहून अधिक कागदी चित्रांचे विषय अन् आकारानुरूप वर्गीकरण करणे, ती चित्रे जतन करण्याच्या दृष्टीने त्यांवर प्रक्रिया करणे, संकेतांक देणे, जीर्ण झालेल्या चित्रांची छायाचित्रे काढणे अथवा ती स्कॅनिंग करून ठेवणे
४. संस्थेच्या उपक्रमांच्या वेळी काढलेल्या १० सहस्रांहून अधिक चित्रांचे स्कॅनिंग आणि वर्गीकरण करणे, तसेच त्यांना संकेतांक देणे
(आवश्यक कौशल्य : फोटोशॉप आणि कार्यालयीन सेवांचा अनुभव)
१ ऐ. अक्षरयोग
१. सात्त्विक अक्षरे आणि अंक यांची संगणकीय लिपी करण्यासाठी आवश्यक अक्षरे अन् अंक यांचा स्पंदनशास्त्रानुसार अभ्यास करून ती बनवणे
१ ओ. कलेच्या संदर्भातील पुढील विषयांचे ग्रंथ करणे
१. सूक्ष्म-चित्रांचा ग्रंथ
२. आश्रमात होणार्या वैशिष्ट्यपूर्ण पालटांच्या चित्रांचा ग्रंथ
३. बालसाधकांनी, तसेच अन्य कलाकार साधकांनी काढलेल्या चित्रांचा ग्रंथ
४. प्रबोधनपर चित्रांचे रेखाचित्रांत रूपांतर करून लहान मुलांसाठी ‘चित्रे रंगवा !’, हा ग्रंथ
५. देवतांच्या तत्त्वांनुसार रांगोळ्या सिद्ध करून त्यांचा ग्रंथ
जे साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी व्यवसाय म्हणून विज्ञापने, ‘फोटो एडिटिंग’ अथवा तत्सम तांत्रिक कामे करतात, तेही स्वतःचा व्यवसाय सांभाळून या धर्मसेवेसाठी विनामूल्य योगदान देऊ शकतात. ही सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
वरील सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे sanatan.sanstha२०२५@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (३०.८.२०२३)