‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला संशोधनाच्या कार्यासाठी नृत्यासंबंधी साहित्याची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना आवाहन !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘नृत्यकला’ ही गायन आणि वादन यांच्याप्रमाणे मानवाला आनंद प्रदान करणारी एक कला आहे. मनुष्य नृत्याच्या माध्यमातूनही ईश्‍वराशी सहज एकरूप होऊ शकतो. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे साधक नृत्याच्या माध्यमातून साधना करून विविध अनुभूती घेत आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने विविध भारतीय, तसेच विदेशी नृत्यांचे नाना प्रयोगांद्वारे तुलनात्मक संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यांमध्ये नृत्य करणार्‍याने परिधान केलेला पोषाख, दागिने, घुंगरू इत्यादींचा नृत्य करणार्‍यावर, तसेच प्रेक्षकवर्गावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.

या प्रयोगांसाठी ‘कथ्थक, भरतनाट्यम् इत्यादी भारतीय शास्त्रीय, तसेच गरबा, भांगडा, कोळीनृत्य इत्यादी लोकनृत्यांच्या वेळी परिधान करण्यात येणारे पोशाख, नृत्यासाठी लागणारे विविध दागिने, घुंगरू’ इत्यादींची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संगीत अन् नृत्य यांच्या संदर्भातील संशोधनाच्या कार्यात नृत्यासाठी लागणारे सुस्थितीत असलेले साहित्य अर्पण करू इच्छितात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८

संगणकीय पत्ता : contact४mav@gmail.com

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.’ (३०.८.२०२३)