हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !
‘हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे।’, म्हणजे ‘कलियुगात संघटितपणात शक्ती असते’ या तत्त्वानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन आवश्यक आहे. भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था