श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य !
‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’च्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कथित प्रबोधनाचा प्रयत्न !
मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’ने ‘गणेशचतुर्थी २०२३ स्पेशल साँग पोलीस बप्पा’ म्हणून ‘ नशे से मुक्ती’ हे गीत प्रसारित केले आहे. यामध्ये श्री गणेशवंदन करत कलावंतांनी श्री गणेशापुढे नृत्य केले आहे. या गीतामध्ये श्री गणेशाला शास्त्रानुरूप दाखवण्याऐवजी पोलिसांच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे.
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अनिल कपूर, पद्मनी कोल्हापूरे, अनु मलिक, उषा नाडकर्णी, राखी टंडन आदी कलाकारांनी या गीतामध्ये नृत्य केले आहे.
(‘श्री गणेशाचे रूप कसे असावे ?’ हे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे आराधनेसाठी शास्त्रात सांगितल्यानुसार देवतेची मूर्ती असणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे. उलट नाविन्याच्या नावाखाली देवतेचे रूप अशास्त्रीय पद्धतीने साकारणे, हा त्या देवतेच्या तत्त्वाचा अवमान आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|