निज्जर याच्या हत्येचे पुरावे काही आठवड्यांपूर्वी भारताला दिले !
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा दावा !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी काही आठवड्यांपूर्वी भारत सरकारला पुरावे दिले होते. जे विश्वासार्ह आहेत, असा दावा केला आहे; मात्र ‘पुरावा म्हणून भारताला काय दिले आहे ?’, हे त्यांनी सांगितले नाही. ट्रुडो म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, ते (भारत) आमच्यात सहभागी होतील जेणेकरून आम्ही या अत्यंत गंभीर प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकू.
Prime Minister Justin Trudeau has said Canada has shared with India evidence of “credible allegations” about the involvement of Indian agents in the killing of #HardeepSinghNijjar many weeks ago.#CanadaIndiaconflict #JustinTrudeau #NarendraModi https://t.co/1BIbzw6KG6
— The Telegraph (@ttindia) September 23, 2023
१. कॅनडातील ‘सीबीसी’ वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार जेव्हा भारतीय अधिकार्यांवर बंद दरवाजाआड दबाव टाकण्यात आला, तेव्हा त्यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या हस्तक्षेपाचा पुरावा असल्याचे नाकारले नाही, असा दावा करण्यात आला आहे.
२. या वृत्तात असेही म्हटले आहे की, निज्जरच्या हत्येच्या अन्वेषणात सहकार्य मिळवण्यासाठी कॅनडाच्या अधिकार्यांनी अनेक वेळा भारताला भेट दिली. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस ऑगस्टमध्ये ४ दिवस भारतात होत्या. आताही जी-२० परिषदेच्या वेळी त्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासमवेत ५ दिवस भारतात होत्या.
संपादकीय भूमिकाकाय पुरावे दिले, हे ट्रुडो जगजाहीर का करत नाहीत ? |